नागपुरात अमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑटोमोटिव्ह चौक ते कामगारनगर चौक मार्गावर पोलिसांनी सापळा रचून एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एकूण चार जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या. या कारवाईत नंदू विष्णू हालगोने आणि चेतन महादेव ढवळे या दोघांसह दोन महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक महिला जरीपटका परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या ताब्यातून ३.१४० ग्रॅम एमडी पावडर, चार मोबाईल, रोख रक्कम आणि दोन दुचाकी असा एकूण २ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही टोळी शहरात एमडी ड्रग्ज विक्रीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय आहे.
#Drug #Nagpur #crimenews #Lokmatnagpur #maharashtranews #marathinews